चिपळूण : चिपळूण-गुहागर बायपासवरील बावशेवाडी वळण धोकादायक बनले असून अपघातांची शक्यता वाढली आहे. या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवून अपघातांना आळा घालावा, अशी मागणी महालक्ष्मी मित्र मंडळ, महालक्ष्मीनगर (खंड बायपास, चिपळूण) यांनी केली आहे.
या संदर्भात मंडळाच्या वतीने सा.बां. उपविभाग (रोहयो) चिपळूणचे उपअभियंता यांना लेखी निवेदन देण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर मागणीवर आम्ही गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा करीत आहोत. सहा महिन्यांपूर्वी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करूनही अद्याप स्पीड ब्रेकर बसवला नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 13/Sep/2025














