साडवली : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या कोकण प्रांतच्या कार्यकारिणीने संगमेश्वर तालुका कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीचा कालावधी डिसेंबर २०२८ पर्यंत आहे. यामध्ये प्रवीण जोशी (अध्यक्ष), अभिषेक अग्रवाल (उपाध्यक्ष), धनंजय दळवी (सचिव), अजित शिंदे (कोषाध्यक्ष), राहुल सप्रे (संघटक), दीपक पोंक्षे (सहसंघटक), कार्यकारिणी सदस्य-संतोष पुरोहित, अभिजित कदम, प्रशांत सनगले, वरद तांबे, स्वरांजली निवळकर, मीनाक्षी खामकर, अॅड. उज्ज्वला चव्हाण आणि विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अथर्व कदम यांची निवड करण्यात आली.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे वार्षिक सदस्यता अभियान सुरू असून, सर्व सुजाण नागरिकांनी ग्राहक पंचायतीचे सदस्य व्हावे व ग्राहक चळवळ गावापर्यंत नेण्यासाठी योगदान देऊन सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रीय सहसचिव नेहा जोशी यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 13/Sep/2025














