रत्नागिरी : तालुक्यातील पावस येथील एसटी स्टैंड जवळ किरकोळ कारणातून रिक्षा चालकाला हातांच्या ठोशांनी तसचे लोखंडी वस्तूने मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवार १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वा. घडली.
समिर जगन्नाथ जाधव (४२, रा. नाखरे खांबडवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात रिक्षा चालक आनंद प्रभाकर रांगणकर (४०, मुळ रा. गणेशगुळे सध्या रा. तांबळवाडी पावस, रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार, बुधवारी सायंकाळी आनंद रांगणकर हे पावस एसटी स्टँडजवळ उभे होते. त्यावेळी संशयित समिर जाधवने रागाने का बघतोस असे विचारुन बाजूच्या रिक्षामधील छोटी लोखंडी वस्तू हाताच्या मुठीतून आणली. त्या नंतर फिर्यादीच्या डाव्या डोळ्याच्या भुवईजवळ मारुन दुखापत केली. तसेच हातांच्या ठोशांनी छातीवर, डोक्यावर मारुन शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत अधिक तपास पूर्णगड पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 13/Sep/2025














