Ratnagiri : ‘क्षत्रिय मराठा’ तर्फे रविवारी हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी : क्षत्रिय मराठा मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त (कै.) मालती मधुकर देसाई स्मरणार्थ पहिली ते सहावीच्या आणि सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी व इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धा, ज्येष्ठ नागरिकांसाठी (६० वर्षांवरील) मराठी व इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धा रत्नागिरी तालुक्यातील मराठा समाजबांधवांसाठी आयोजित करण्यात येत आहे.

ही स्पर्धा रविवारी (ता. १४) होणार आहे. प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकाला विशेष पारितोषिक देऊन त्यांचा वर्धापन दिन कार्यक्रमात गुणगौरव करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षराची आवड निर्माण व्हावी, ज्यायोगे वळणदार अक्षराची ही सवय भावी आयुष्याच्या जडणघडणीत उपयुक्त ठरेल, या उद्देशाने व सध्याच्या पिढीच्या ऑनलाइन जीवनात दुर्लक्षित होत चाललेल्या हस्ताक्षर कलेला पुनर्जीवित करण्याचा एक प्रयत्न क्षत्रिय मराठा मंडळातर्फे करण्यात येत आहे. स्पर्धा १४ सप्टेंबरला कणाद क्लासेस, इंद्रधनू, कर्लेकरवाडी, मारुती मंदिर रत्नागिरी येथे सकाळी ११ वा. घेण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी सकाळी १०.४५ वा. स्वतःचे लेखनसाहित्य घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन क्षत्रिय मराठा मंडळाने केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 PM 13/Sep/2025