गुहागर : भारतीय जनता पक्ष गुहागर तालुक्याच्यावतीने शनिवार दि. २० सप्टेंबर रोजी शृंगारतळी नजीक जानवळे येथील भवानी सभागृहात सायंकाळी ५ पासून पारंपारिक जाखडी नाच महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
जुनी लोककला परंपरा ही टिकली पाहिजे या उद्देशाने पारंपारिक जाखडीला व्यासपीठ मिळावे, वेगवेगळ्या पद्धतीने नाचाचे प्रकार, जुनी महाभारत, रामायण कथेवरील गाणे आधुनिक तंत्रज्ञान युगात नवीन पिढीला समजली पाहिजे यासाठी या पारंपारिक जाखडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:05 PM 13/Sep/2025














