Chiplun : सिद्धी शिंदे हिची भारतीय नौदलात निवड

चिपळूण : मंदार एज्युकेशन सोसायटीचे शैलजा शिंदे वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील सिद्धी संतोष शिंदे (टी.वाय.बी. एस्सी.) हिची भारतीय नौदलात निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रांजणे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षपद वरिष्ठ महाविद्यालय व एम.बी.ए. कॉलेजचे पर्यवेक्षक आर. डी. पाटील यांनी भूषवले.

या कार्यक्रमासाठी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग व एम. बी. ए. कॉलेजचे प्राध्यापक, वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन व सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. सूत्रसंचालन प्रा. दीपा पाटील यांनी केले. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य उमेश कांबळी व एम.बी.ए. कॉलेजचे संचालक मिरजकर, तसेच वरिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्रा. कुलकर्णी व नवले यांनी सिद्धी शिंदे हिचे कौतूक केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:17 PM 13/Sep/2025

Infigo Eyecare