राजापूर : घरासमोरील अंगणात उभी करुन ठेवलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना राजापूर तालुक्यातील कोंड्येतर्फ सौंदळ रस्तावाडी येथे घडली. या दुचाकीची किंमत सुमारे ५५ हजार असून ही चोरी गुरुवारी सकाळी ८:३० वाजण्याच्या दरम्यान उघडकीला आली. याप्रकरणी महेश गोपाळ कारेकर (वय ३९) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार त्यांनी घरासमोरील अंगणात दुचाकी उभी केली होती. गुरुवारी सकाळी ते दुकान उघडण्यासाठी घराबाहेर आले असता दुचाकी दिसली नाही. याप्रकरणी अधिक तपास राजापूर पोलिस करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:41 PM 13/Sep/2025














