Lanja : वेरवली येथील श्रीराम विद्यालयाची ‘राक्षस’ विज्ञान नाटिका स्पर्धेत प्रथम

लांजा : लांजा तालुका माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या विज्ञान नाटिका स्पर्धेत श्रीराम विद्यालय वेरवली बुद्रुक च्या ‘राक्षस’ या विज्ञान नाटिकेने प्रथम क्रमांक पटकावला. तालुक्यातील वेरवली येथील श्रीराम विद्यालय, तुकाराम पुंडलिक शेटे कनिष्ठ महाविद्यालय व का.रा. कोळवणकर यामाहा ट्रेनिंग स्कूलमध्ये ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत श्रीराम विद्यालय वेरवली बुद्रुक च्या ‘राक्षस’ या विज्ञान नाटिकेने प्रथम क्रमांक पटकावला.

प्लास्टिकच्या अतिवापराचे होणारे दुष्परिणाम व त्याबाबत घ्यावयाची दक्षता यावर प्रकाश टाकणाऱ्या या नाटीकेने प्रेक्षकांची व परीक्षकांची मने जिंकली.

या नाटिकेमध्ये कुमार तन्मय चव्हाण, संस्कार चव्हाण, निखिल कुळये, पूर्वी राणे, सुजला शिगम, सार्थक मोसमकर, अर्णव जाधव व हर्ष शिंदे या विद्यार्थी कलाकारांनी आपल्या कलेची चुणूक दाखवली. या नाटिकेचे लेखन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक प्रदीप लाड व विनोद बंडगर यांनी तर दिग्दर्शन श्रुतीक प्रभुलकर यांनी केले होते. शालेय समिती अध्यक्ष व सीने नाट्य अभिनेते, लेखक, दिग्दर्शक अमोल रेडीज यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या या नाटीकेने उपस्थित मान्यवरांची वाहवा मिळवली.

प्रशालेने प्राप्त केलेल्या या यशाचे कौतुक संस्थेचे सर्व संचालक, पालक व पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून होत असून या नायिकेची जिल्हास्तरासाठी तालुक्यातून निवड झाली आहे.

JMBR ACADEMY – ADMISSIONS OPEN!

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:58 PM 13/Sep/2025