10th Board Exam: दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सोमवारपासून सुरू

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून (ता.१५) सुरू होणार आहे.

दहावीची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे अर्ज ‘युडायस प्लस’मधील पेन-आयडीवरून ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या शाळांमार्फत भरून घेण्यात येणार आहेत.राज्य मंडळाच्या वतीने नियमित विद्यार्थ्यांसह पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत आणि तुरळक विषय, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे अशा विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेचे अर्ज www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या शाळाप्रमुखांमार्फत भरायचे आहेत. विद्यार्थ्यांचे अर्ज १५ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत भरता येणार आहेत, अशी माहिती राज्य मंडळाने दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:33 13-09-2025

Happy journey marathi