Mumbai goa highway : महामार्गावर वाकेड-बोरथडे येथे कंटेनर उलटला

लांजा : मुंबई-गोवा महामार्गावर वाकेड-बोरथडे फाटा येथे मालवाहू कंटेनर महामार्गाच्या मध्यभागी कलंडल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प पडली होती. दरम्यान, अपघात घडल्याचे समजताच वाहन चालकांनी एकेरी वाहतूक सुरू केली होती. ही घटना शनिवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

मुंबईहून गोव्याच्या दिशेने खत घेऊन जाणारा कंटेनर (एम.एच. ०९, ई.एम. ३३३७) निघाला होता. कंटेनर मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड बोरथडे फाटा येथे आला असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर महामार्गाच्या मध्यभागी कलंडला. अपघातग्रस्त कंटेनरमुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प पडली होती. अपघातानंतर खताची पोती महामार्गावर विखुरली गेली. लांजा पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेऊन खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. कलंडलेल्या कंटेनरमधील साहित्य बाजूला केल्यानंतर दुपारी क्रेनच्या साहाय्याने कंटेनर बाजूला केल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 15/Sep/2025