रत्नागिरी : शहरातील झाडगावनजीकच्या विनायक अपार्टमेंटच्या पार्किंगमधील दुचाकी अज्ञाताने लांबवली. ही घटना २७ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते २९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वा. कालावधीत घडली आहे. याबाबत चंद्रकांत शांताराम खरात (वय ६२, रा. विनायक अपार्टमेंट, झाडगाव, रत्नागिरी) यांनी १२ सप्टेंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार चंद्रकांत खरात यांनी आपली ज्युपिटर दुचाकी (एमएच-०८-एएल-१८२२) अपार्टमेंटच्या पार्किंगेमध्ये उभी केली होती.
ती अज्ञाताने चोरून नेली. खरात यांनी दुचाकीचा शोध घेतला; परंतु, ती मिळून न आल्याने त्यांनी अखेर शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 AM 15/Sep/2025














