Chiplun : ‘त्या’ कोसळलेल्या पुलाचे काम युद्धपातळीवर होणार

चिपळूण : तालुक्यातील दसपटी विभागाकडे जाणाऱ्या मार्गावर कोसळलेल्या पिंपळी पुलाची पाहणी करण्यासाठी शुक्रवार, दि. १२ सप्टेंबर रोजी औद्योगिक विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता सचिन राधे दाखल झाले. त्यांनी या पुलावर भेट देऊन माहिती घेतली आणि या पुलाचे काम शुद्ध पातळीवर सुरू केले जाईल, असे उपस्थिताना सांगितले.

ही दुर्घटना घडल्यानंतर दसपटी परिसर आणि खडपोली औद्योगिक क्षेत्रामधील वाहतूक याबाबत माहिती घेतली. या परिसरातील नागरिकांना वळणवळण कशा पद्धतीने लवकरात लवकर उपलब्ध करून देता येईल, यावाचत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

याप्रसंगी खडपोली साफयीस्ट अधिकारी उपस्थित होते. त्यांनी कंपनीचे होणारे नुकसान आणि गैरसोय सचिन राधे यांच्या निदर्शनास आणून दिली. राक्षे यांनी या सर्व परिस्थितीवर कशा पद्धतीने मार्ग काढता येईल, या दृष्टीने दशरथ दाभोळकर यांच्याशी चर्चा करून याबाबत विचारविनिमय केला. सर्व परिस्थितीचे अवलोकन करून श्री. सचिन राजे यांनी औद्योगिक क्षेत्रासोबतच परिसरातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी युद्ध पातळीवर यंत्रणा राबवून लवकरात लवकर पिंपळी खडपोली पुलाचे काम पूर्णत्वास येण्याची माहिती यावेळी दिली. याप्रसंगी त्यांच्यासोबत रत्नागिरी कार्यकारी अभियंता सतीश पोवार, उपअभियंता आर. एस. पिंपळे, किशोर हळदणकर, उपअभियंता संदीप पवार आदी एमआयडीसीचे अधिकारी वर्ग उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 AM 15/Sep/2025