Smart Meter : टीओडी स्मार्ट मीटरमुळे वीज ग्राहकांना पारदर्शक, नियंत्रणक्षम सेवा : महावितरण

रत्नागिरी : महावितरणने कोकण परिमंडलात टीओडी (टाईम ऑफ डे) स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सुरू केली असून, ग्राहकांना त्यांच्या वीज वापराची रियल टाईम माहिती मिळणार आहे. यामुळे वीज बिलावर थेट नियंत्रण ठेवता येणार आहे, अशी माहिती महावितरण कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

टीओडी (टाईम ऑफ डे) स्मार्ट मीटर मुळे ग्राहकांवर कोणताही खर्चाचा भार नाही; खर्च महसूल वाढीतून भागवला जाणार आहे, जुने मीटर बदलून टीओडी स्मार्ट मीटर बसवले जात आहेत.

मीटरमधून दर तासानुसार युनिटची माहिती मोबाईलवर मिळणार आहे तसेच दिवसा स्वस्त दरात वीज वापरण्यास प्रोत्साहन मिळणार आहे नियामक आयोगाने सवलती मंजूर केल्या आहेत. अशी माहिती महावितरणच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली जनजागृतीसाठी डेमो मीटर कार्यालयात उपलब्ध; ग्राहकांनी अफवांना बळी न पडता सहकार्य करावे. महावितरणने स्पष्ट केले आहे की हे मीटर राष्ट्रीय मानांकन प्राप्त असून, ग्राहकांच्या हितासाठीच बसवले जात आहेत, असेही महावितरणच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:30 PM 15/Sep/2025