Lanja : वाहतुकीस व रहदारीस अडथळा; वाहनचालकांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी : सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीस व रहदारीस अडथळा होईल, असे वाहन पार्क करणाऱ्या दोघांविरुद्ध लांजा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण दत्ताराम घाग (वय ४८, रा. सालपे-घागवाडी, ता. लांजा) व विठ्ठल शंकर पवार (वय ४१, रा. केळंबे ता. लांजा) अशी संशयित वाहन चालकांची नावे आहेत.

या घटना शनिवारी (ता. १३) सायंकाळी साडेपाच ते पावणेसहाच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर आपली खानावळ रस्त्यावर निदर्शनास आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित चालक प्रवीण घाग यांनी टेम्पो (एमएच-०८-एक्यू-३५६८) आणि विठ्ठल पवार यांनी मोटार (एमएच-१२-एफडी-६८७७) वाहतुकीस व रहदारीस अडथळा होईल अशी सार्वजनिक रस्त्यावर लावली. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सोपान पवार यांनी पोलिसात तक्रार दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 PM 15/Sep/2025