Khed : मिर्लेत तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण

खेड : तालुक्यातील मिर्ले येथे तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे हा हल्ला नदीतील अवैध वाळू काढण्यासाठी कामावर न आल्याचा राग मनात धरून केला असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. अमीर रवींद्र निकम (२६, रा.लक्ष्मीनगर, खोपी, ता. खेड) हा मंडप सजावटीची कामे करतो.

मे महिन्यात केतन प्रमोद साळवी याने त्याला रात्री वाळू काढण्यासाठी मजुरीवर बोलावले होते. मात्र अमीर निकम याने मी रात्री कामाला येणार नाही, असे सांगून नकार दिला होता. त्याचा राग धरून ११ सप्टेंबरला रात्री अमीर निकम आपल्या सोबत्यांसह मंडपाच्या कामावर जात असताना मिर्ले-बौद्धवाडी येथे प्रणित प्रमोद साळवी, केतन प्रमोद साळवी, नंदेश साळवी व नरेश साळवी यांनी त्याला अडवले. प्रणित साळवी याने जातीवाचक शिवीगाळ करून तुला घरात येऊन मारू, असे म्हणत अमीर निकम याला हाताने ढकलून पाडले आणि लोखंडी रॉडने डोक्यात प्रहार केला. इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जखमी अवस्थेत त्याला कळंबणी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी खेड पोलिसात प्रणित, केतन, नंदेश आणि नरेश साळवी (सर्व रा. मिर्ले, ता. खेड) या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 PM 15/Sep/2025

Mahrashi karve ANM