स्त्री-पुरुष समाजाची दोन चाके : प्रा. डॉ. रुपा शहा

रत्नागिरी : स्त्री आणि पुरुष ही दोघेही समाजाची दोन चाके असून, दोघांनीही एकमेकांना समजून वाटचाल केली पाहिजे, असे आवाहन स्त्री प्रश्न, स्त्री वादाच्या अभ्यासक प्रा. डॉ. रुपा शहा यांनी केले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे आयोजित महिलांच्या शाश्वत विकासासाठी शिक्षण, समानता आणि सक्षमीकरण आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलत होत्या. त्यांनी उस्फूर्त आणि ओघवत्या भाषाशैलीतून शाश्वत विकास म्हणजे काय ते सांगितले. स्त्रियांचे समाजातील स्थान, त्यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या आणि मर्यादा, स्त्रीशिक्षण, आजही अस्तित्वात असलेला स्त्री-पुरुष भेद, निर्णय प्रक्रियेत असलेले नगण्य स्थान स्त्रियांचा राजकीय सहभाग, त्यातील उदासीनता आदींवर भाष्य केले.

परिषदेच्या बीजभाषक डॉ. लीना बावडेकर यांनी आपल्या भाषणातून भारतीय तत्त्वज्ञान आणि संस्कृती, प्राचीन काळापासून ते आधुनिक काळातील कला, साहित्य, सांस्कृतिक, प्रशासन, विज्ञान, माहिती, तंत्रज्ञान आणि अन्य क्षेत्रातील महिलांच्या योगदानाचा आढावा घेतला. प्रा. डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, प्राचार्य डॉ. अॅड. आशिष बर्वे, प्रा. डॉ. यास्मिन आवटे, सीमा यादव, प्रा. डॉ. सीमा कदम यांनी भूषविले. प्रमुख निमंत्रित म्हणून लॉरा विल्यम्स, ब्रिर्गिट जलाव, लिंडा रेडमन, प्रतिभा छाबरा, भाविनी पटेल, मनिषा कंद, दीपा मेनन, अक्षता दाभोळकर आदींनी गटचर्चेत भाग घेतला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:18 PM 15/Sep/2025