देवरूख : क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व रत्नागिरी जिल्हा क्रिडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने व रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या सहकार्याने जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा 09 ते 10 सप्टेंबर 2025 दरम्यान डेरवण क्रिडा संकुल चिपळूण येथे 14,17,19 वयोगटामध्ये राज्य क्रीडा मार्गदर्शक सचिन मांडवकर,जिल्हा क्रिडा अधिकारी विजय शिंदे जिल्हा संघटना अध्यक्ष व्यंकटेश्वरराव कररा, डेरवण क्रिडा संकुलनाचे संचालक श्रीकांत पराडकर, गणेश जगताप,उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, खजिनदार शशांक घडशी, सचिव लक्ष्मण कररा, पंच प्रमुख भरत कररा, चिपळूण तालुका समन्वयक समीर कालेकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.
या स्पर्धेसाठी संगमेश्वर, चिपळूण, खेड, रत्नागिरी, लांजा, राजापूर, दापोली, मंडणगड, गुहागर तालुक्यांमधून सुवर्णपदक पटकावले खेळाडू सहभागी झाले होते. या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या खेळाडूंची निवड विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेमध्ये करण्यात आली आहे यामध्ये संगमेश्वरच्या तायक्वांदो पट्टूंनी अतिशय उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत 8 सुवर्ण पदक पटकावले सुवर्णपदक पटकावलेल्या खेळाडूंची निवड दिनांक 12 व 13 सप्टेंबर 2025 रोजी जय किसान क्रीडा मंडळ वडवणे,तालुका करवीर,जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे.
*पदक प्राप्त खेळाडू पुढील प्रमाणे*
*14 वर्ष वयोगटामध्ये मुले*
1.अजिंक्य शिंदे – सुवर्णपदक- पैसा फंड इंग्लिश मीडियम स्कूल संगमेश्वर
2.साहिल जागुष्ट्ये -सुवर्णपदक – अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल देवरुख
3.अधिराज कदम – सुवर्णपदक – अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल देवरुख
4.यशराज कटके – रौप्य पदक – अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल देवरुख
5.अफजान फुलारी – रौप्य पदक – न्यू इंग्लिश स्कूल देवरुख
6.सोमांश सावंत – रौप्य पदक – कै. सौ. मीनाताई ठाकरे हायस्कूल साडवली
7.सोहम मालगुंडकर – रौप्य पदक – न्यू इंग्लिश स्कूल कसबा
*17 वर्ष वयोगटामध्ये मुले*
1. आदित्य चिपळूणकर – सुवर्णपदक – कै. सौ. मीनाताई ठाकरे हायस्कूल सडवली
2. प्रथमेश शेट्ये – सुवर्णपदक – पैसा फंड हायस्कूल संगमेश्वर
3. शौर्य लोध – कांस्य पदक – अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल देवरुख
4. ऋतिक रसाळ – कांस्य पदक – आश्रम शाळा निवे
5. आदित्य आंबवकर – सहभाग -दादासाहेब सरफरे बुरंबी
*19 वर्ष वयोगटामध्ये मुले*
1. स्मित खांडेकर – रौप्य पदक – आश्रम शाळा निवे
*14 वर्ष वयोगटामध्ये मुली*
1. शुभ्रा सुर्वे – कांस्य पदक – न्यू इंग्लिश स्कूल कसबा
*17 वर्ष वयोगटामध्ये मुली*
1. श्रावणी इप्ते – सुवर्णपदक – लोक विद्यालय तुळसणी
2. सान्वी रसाळ – सुवर्णपदक – आश्रमशाळा निवे
3. सान्वी जागुष्टे – रौप्य पदक – गुरुवर्य काकासाहेब कनिष्ठ महाविद्यालय देवरुख
4. सेजल बावधने – कांस्य पदक – गुरुवर्य काकासाहेब कनिष्ठ महाविद्यालय देवरुख
*19 वर्ष वयोगटामध्ये मुली*
1. समृद्धी घडशी – रौप्य पदक – कै.सौ.मीनाताई ठाकरे सायन्स जुनिअर, कॉलेज,साडवली
2. हृदया कदम – कांस्य पदक – गुरुवर्य काकासाहेब कनिष्ठ महाविद्यालय देवरुख
या यशस्वी तायक्वांदो पट्टुंना प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी, स्वप्निल दांडेकर, साईप्रसाद शिंदे, सुमीत पवार, तालुका समन्वय अभिजीत कदम, क्रिडा शिक्षक श्रीकांत यादव, सागर पवार, नवनाथ खोत्रे, तानाजी कदम, समीर यादव, अक्षय कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाबद्दल तालुका अँकॅडमीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. सुभाषजी बने, तालुक्याचे आमदार शेखर निकम,माजी राज्यमंत्री रविंद्र माने, क्लब अध्यक्षा सौ.स्मिता लाड,जिल्हा संघटना अध्यक्ष व्यंकटेश्वरराव कररा, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रोहन बने, माजी नगराध्यक्ष मृणाल शेट्ये, नगरपंचायतचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले, माजी उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये, क्लब उपाध्यक्षा ॲड. सौ पुनम चव्हाण, क्लब उपाध्यक्ष संदेश जागुष्ट्ये, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सुु आर्ते, माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड,अँकॅडमीचे उपाध्यक्ष परेश खातू, खजिनदार दिपक हळबे, क्लब सदस्या रुपाली कदम, स्वाती नारकर, पालक प्रतिनिधी आदिती लोध,टेक्निकल प्रमुख चिन्मय साने, सिनियर खेळाडू सौरभ वनकर, निखिल लाड, सानिका प्रसादे,संकेत मापुस्कर,पंकज मेस्त्री, सुशांत मेस्त्री,सिद्धी केदारी,वेदांत गिड्ये, गायत्री शिंदे आदींनी अभिनंदन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:25 15-09-2025














