रत्नागिरी : तालुक्यातील जयगड-नांदिवडे कमान रस्त्यावर १४ चाकी ट्रकने कारला धडक दिली. या अपघातातील ट्रक चालकाविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल श्रीकांत वाटमकर (२५, रा. पढतरवाडी, कन्हाळ रोड, ता. अतनी, जि. बेळगाव राज्य कर्नाटक) असे संशयित चालकाचे नाव आहे.
ही घटना शनिवार 13 सप्टेंबर रोजी रात्री 8.45 वा. सुमारास नांदिवडे कमानीच्या समोरील रस्त्यावर घडली. फिर्यादी श्रीकृष्ण अनंत बिवलकर (३४, रा. नांदिवडे-विठ्ठलवाडी, रत्नागिरी) हे आपल्या ताब्यातील कार (एमएच-०८ एएक्स ५६०९) ही घेऊन जयगड पोलिस चेकपोस्ट ते नांदिवडे असा प्रवास करत होते. नांदिवडे पार्किंगचे ठिकाणी नांदिवडे कमानीच्या समोरिल रस्त्यावरुन रस्ता क्रॉस करुन पुढे गेल्यावर जयगड ते खंडाळा अशा रोडने येणारा १४ चाकी ट्रक (के. अ-२८ सी ६६४०) वरिल चालकाने फिर्यादी श्रीकृष्ण बिवलकर यांच्या कारला धडक देऊन अपघात केला. या प्रकरणी श्रीकृष्ण बिवलकर यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास जयगड पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:32 PM 15/Sep/2025














