रत्नागिरी : शहरातील हॉटेल विवेक येथे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरी सन २०२४-२५ ची वार्षिक सर्वसाधारण सभा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी शाखेत सभासद वाढवण्याच्या महत्त्वाच्या सूचना दिल्या गेल्या. तसेच नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाटकांची स्पर्धा यंदा २ ऑक्टोबर २०२५ ते ३१ मे २०२६ या कालावधीमध्ये घेण्याचा निर्णय घेतला गेला. या बैठकीत उपाध्यक्ष श्रीकांत भाटवडेकर, कार्याध्यक्ष समीर इंदुलकर, कार्यवाहक वामन कदम, खजिनदार सतीश दळी आदी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. मराठी नाट्यसंस्कृतीच्या विकासासाठी पुढील पावले राबवताना आम्ही सदैव तत्पर आहोत, असे यावेळी पालकमंत्री सामंत यांनी म्हटले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:42 PM 15/Sep/2025














