सावर्डे : ‘शिक्षक हे केवळ धडे शिकविणारे व्यक्तिमत्त्व नाही, तर ते विद्यार्थ्यांच्या जीवनाचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या शिकवणीमुळेच आयुष्यातील आव्हाने पेलण्यास आपण सक्षम होतो, असे प्रतिपादन प्रा. अवनी कदम यांनी केले.
सह्याद्री शिक्षण संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. प्रा. कदम म्हणाल्या, शाळा व महाविद्यालयीन शिक्षक हे नेहमीच पुस्तकी ज्ञानाबरोबरच आपल्याला जीवन जगण्याची कला, शिस्त, मूल्ये, जबाबदारीची जाणीव, जिज्ञासू वृत्ती आणि संस्कारदेखील देत असतात. याप्रसंगी भूमी पाटोळे, ईशा सावंत, तन्वी कदम, पायल महाकाळ, स्नेहल खोपे, सानिया कदम, सानिका वनये, सृष्टी पवार, क्रिश पवार, सांची कदम, खुशी जाधव या विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका पार पाडली. प्राचार्य टी. वाय. कांबळे यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात जे काही साध्य करायचे आहे, ते प्रामाणिकपणे करा, असा सल्ला दिला. डॉ. दीप्ती शेंबेकर, प्रा. जयसिंग चवरे, प्रा. संकेत कुरणे प्रा. सुनील जावीर, प्रा. शेंबेकर उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:49 PM 15/Sep/2025














