Ratnagiri : मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी चार महिने मानधनाविनाच

रत्नागिरी : मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण योजनेत पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असलेल्या अनेकांचे मानधनच गेल्या काही महिन्यांपासुन (मे महिन्यापासून) झाले नसल्याने त्यांच्यामध्ये कमालीची नाराजी उमटत आहे. संगमेश्वर तालुक्यात या प्रशिक्षणार्थी योजनेत शिक्षक, पंचायत समितीच्या विविध विभागात, आरोग्य विभागात, ग्रामपंचायत स्तरावर सुमारे १५० पेक्षा अधिक कार्यरत असुन त्यांचे मे महिन्या पासुनचे मानधनच अद्यापही जमा झालेले नाही. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी योजना आणली. त्यात बारावी उत्तीर्ण, पदविकाधारक, पदवी, डीएड, बीएड अशी शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्यांची नियुक्ती सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आली होती. ५ सप्टेंबरला अनेकांना निवडीनंतर नियुक्तीपत्र देखील देण्यात आली. यात ग्रामपंचायत स्तरावर, पंचायत समिती स्तरावर, आरोग्य विभागात, शिक्षण आणि काहींना शिक्षक म्हणून सहा महिने कालावधी करिता नियुक्ती देण्यात आली. प्रथम या योजनेचा कार्यकाळ सहा महिने होता. मार्च मध्ये या योजनेचा कार्यकाल वाढविण्यात आला आणि तो ११ महिने करण्यात आला.

हा पाच महिन्याचा कार्यकाळ वाढल्यानंतर आधार व्हेरीफेकेशन, कागदपत्र अपलोड करणे, जिल्हाकडुन मंजुरी मिळवणे आणि रिजॉयनिंग करुन घेणे अश्या सगळ्या प्रक्रिया पुर्ण करुन घेण्यात आल्या. कधी साईट बंद तर कधी सर्वर डाऊन अश्या परिस्थितीत ही हि प्रक्रिया पूर्ण होऊन हजेरी देखील अपलोड करण्यात आली आहे. असे असतानाही हे युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी मानधना पासुन वंचित राहिले आहेत. याबाबत जिल्हा स्तरावर विचारना केली असता आमच्या कडुन पुढे गेले आहे आता आयुक्त स्तरावर असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण योजनेचा लाभ जिल्हा भरातील शेकडो तरुण, तरुणींना मिळाला आहे. अनेक ठिकाणी रिक्त असलेल्या पदांचा कार्यभार सांभाळण्यात हे प्रशिक्षणार्थी यशस्वी ठरले आहेत. अगदी शाळांमध्ये देखील ह्यांची भुमिका महत्वाची ठरली आहे. शाळेतील कायम असलेले शिक्षक जेव्हा जेव्हा शाळा बाह्य कामासाठी जात असत, ट्रेनिंग साठी जात असत तेव्हा तेव्हा त्यांनी संपुर्ण शाळा देखील सांभाळली आहे. एकुनच कमी मानधनात देखील युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी आनंदाने कार्यरत होते. मार्च आणि एप्रिल महिण्याचे मानधन गणपती उत्सवापूर्वी जमा झाले आहे. मात्र मे, जुन, जुलै, ऑगस्ट या चार महिन्यांचे मानधन अद्यापहि जमा झालेले नसल्याने कमालीचा संताप व्यक्त होत आहे. जिल्हा भरातुन नाराजीचा सुर उमटत आहे.

आमच्या शिक्षणाप्रमाणे आम्हाला या योजनेत घेण्यात आले तसेच यापुढे देखील आमच्या शिक्षणाप्रमाणे, अनुभवानुसार पुढे सामाऊन घ्या असेही आर्जव जिल्हाभरातुन सरकारकडे करण्यात येत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातुन तश्या प्रकारची आंदोलने सुरु आहेत. सरकार सोबत युवा प्रशिक्षणार्थीच्या वतीने आंदोलनकर्त्यांची बोलणी देखील सुरु आहेत. आता सरकारने सकारात्मक भुमिका घेतली तर अनेक जिल्ह्यातील पात्रताधारक शिक्षित तरुण, तरुणींना याचा फायदा होण्यास मदत होईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:02 PM 15/Sep/2025