Dapoli : मासे पकडण्यास गेलेल्या प्रौढाचा पाण्यात पडून मृत्यू

दापोली : दारुच्या नशेत मुरुड समुद्रकिनारी मासे पकडण्यासाठी गेलेल्या प्रौढाचा पाण्यात पडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. श्याम ज्ञानेश्वर माने (वय ४६, रा. मुरुड-खालची पाखाडी, दापोली) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. त्यांना रुग्णवाहिकेने उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते.

मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी दापोली पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास दापोली पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:14 PM 15/Sep/2025