Khed Railway Station : खेड रेल्वे स्थानकात वृद्धेच्या हातातील बांगडीची चोरी

खेड : येथील रेल्वे स्थानकातून सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेसमध्ये चढताना एका वृद्ध महिलेच्या उजव्या हातातील ७० हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना दि. ११ सप्टेंबर रोजी दुपारी ३:२० वाजण्याच्या सुमारास घडली असून, याबाबतची फिर्याद रंजना वामन पालांडे (६९, रा. दहिसर पूर्व, मुंबई) यांनी ठाणे रेल्वे स्थानकात दिली.

रंजना वामन पालांडे या आपल्या कुटुंबासह गणेशोत्सवानिमित्त खेड येथे आल्या होत्या. दि. ११ सप्टेंबर २०२५ रोजी परत दहिसर, मुंबई येथे येण्यासाठी खेड रेल्वे स्थानकातून पुतण्या विश्वनाथ पालांडे (५१) आणि जाऊबाई आनंदीबाई पालांडे (८०) यांच्यासह सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेसमध्ये चढत होत्या. गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्याने त्यांच्या उजव्या हातातील सुमारे ७० हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी लांबवली. गाडीत बसल्यावर त्यांच्या हातात बांगडी दिसली नाही. या सर्वांना दिवा येथे उतरावयाचे असल्याने ठाणे येथील रेल्वे पोलिस स्थानकात जाऊन रंजना पालांडे यांनी तक्रार नोंदविली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:41 PM 15/Sep/2025