रत्नागिरी : वाढत्या डिझेलचा खर्च, इंधनखर्चावरोवर पैशाची बचतीसाठी तसेच पर्यावरण रक्षणासाठी सीएनजी परिवर्तन एसटी बसेस चालवण्याचा निर्णय राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आगारामध्ये जुन्याच गाड्या सीएनजीमध्ये परिवर्तन केलेल्या ३० बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेस रस्त्यावर धावू लागल्या आहेत. लवकरच आणखी ५० सीएनजी बसेस रत्नागिरी आगारात येणार आहेत. डिझेल बचतीबरोबरच आता प्रवाशांना आरामदायी प्रवास या सीएनजी बसेसद्वारे होणार आहे.
वाढत्या डिझेल किमतीमुळे तसेच विविध कारणांमुळे आता एसटी महामंडळ ई बससेवा, सीएनजीबससेवाकडे अधिक भर देण्यास सुरूवात झाली. रत्नागिरी विभागातील चिपळूण आगारामध्ये तब्बल ३० सीएनजी बसेस दाखल झाल्या. जुन्याच लाल, पांढऱ्या रंगाच्या एसटीबसेसना सीएनजीमध्ये परिवर्तीत करण्यात आल्या आहेत. या बसेस चिपळूण-रत्नागिरीसह जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू झाली आहे.
सीएनजी बसेसची बांधणी माईल्ड स्टीलची असून टाटाच्या नव्या चेसीसवर बांधण्यात आली आहे. या बसेसची क्षमता ४४ प्रवासी आहे. या बसेसला पॅनिक बटण, सोयीस्कर हॅण्डल व आरामदायी आसने देण्यात आली आहे.
याबसेसमध्ये एअर सस्पेन्शन नसल्यामुळे हादरे बसण्याची शक्यात आहे. प्रायोगिक तत्वावर चिपळुण आगारातून सीएनजी बससेवा सुरू झाली आहे. लवकरच रत्नागिरी आगारात आणखी ५० सीएनजी बसेस येणार आहेत, त्यानंतर रत्नागिरी आगारासह विविध ठिकाणी या सीएनजी बसेस धावणार असल्याचे सांगण्यात आले.
चिपळूण, रत्नागिरीमध्ये पंप सुरू
इंधन बचत व तोट्यातून बाहेर पडण्यासाठी एसटी महामंडळाने आता सीएनजी परिवर्तन बसेस ताफ्यात आणल्या आहेत. त्यासाठी रत्नागिरी विभागात तीन पंप होणार आहेत. चिपळूणमध्ये एक पंप सुरू आहे तर रत्नागिरीत एक सुरू आहे तर खेड येथील पंप उभारणीचे काम सुरू आहे.
सीएनजीबससेवा सुरू, ई-बससेवा कधी?
गणेशोत्सवात ई-बसेस येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र रत्नागिरी, चिपळूण, दापोली, खेड या चारपैकी एकाही चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण न झाल्यामुळे अद्याप ई-बसेस जिल्ह्यात आल्या नाहीत. जोपर्यंत चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत या बसेसही जिल्ह्यात येणार नाहीत. त्यामुळे या दिवाळीत तरी ई-बसेस येऊन, येथील रस्त्यांवर धावतील का, अशीच चर्चा रत्नागिरीकर करत आहेत.
इंधन बचत, पर्यावरणाचे संवर्धन तसेच प्रवाशांना आरामदायी सुविधासाठी सीएनजी एसटी बससेवा चिपळुण आगारातून सुरू केली आहे. एकूण ३० बसेसने सेवा सुरू आहे. रत्नागिरी आगारात लवकरच ५० सीएनजी बसेस येतील. त्यानंतर इतर आगारातही सीएनजीचे बसेस सुरू होतील. चिपळुणमध्ये एक पंप सुरू आहे तर रत्नागिरीत, खेडमध्ये ही पंप सुरू होतील. या पंपामुळे ३०० कि. मी. एसटी बस चालते. इंधनाबरोबरच पैशांची बचत होण्यास मदत होणार आहे. – प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:58 PM 15/Sep/2025














