Devrukh: जातिनिहाय जनगणनेसाठी देवरूखमध्ये निदर्शने

रत्नागिरी : राजकीय आरक्षण बचाव तसेच ओबीसीसह सर्वच वर्गाची जातनिहाय जनगणना करावी, या मागणीसाठी कुणबी तसेच ओबीसी बंधू-भगिनीनी देवरूख येथील संगमेश्वर तालुका तहसीलदार कार्यालयासमोर भर पावसार निदर्शने केली.

आज सकाळी ११ वाजता ही निदर्शने करण्यात आली. मराठा कुणबी एकच असून हैदराबाद गॅझेटीअरची अंमलबजावणी करून मराठा-कुणबी दाखले देण्यासाठी सरकारने जीआर काढला आहे. त्याविरोधात ओबीसीमध्ये असलेला मूळ कुणबी समाज आक्रमक झाला असून कुणबी संघाच्या वतीने मुंबईसह कोकणातील सर्वच तहसीलदार कार्यालयांसमोर निदर्शने करून निवेदने देण्यात आली. सरकारने काढलेला जीआर रद्द करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 16-09-2025