चिपळूण : शहरातील मुरादपूर रोडवरील अमेय पार्क येथे एका ४४ वर्षीय प्रौढाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नीलेश यशवंत भोसले (मूळ रा. कापसाळ नवीन वसाहत) असे मृताचे नाव आहे. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १४ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० ते सायंकाळी ५ या दरम्यान अमेय पार्कमध्ये ही घटना घडली.
या बाबतची खबर हेमंत यशवंत भोसले यांनी चिपळूण पोलिसांना दिली. नीलेश यशवंत भोसले याने अमेय पार्कमधील सदनिकेमध्ये किचनच्या फॅनला नायलॉन दोरी बांधून गळफास लावून घेतला व त्यात त्याचा मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अधिक तपास चिपळूण पोलिस करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 AM 16/Sep/2025














