लांजा : तालुक्यातील कोंडगे गावात उभारलेला बीएसएनएल टॉवर बंदावस्थेत आहे. हा टॉवर त्वरित सुरू करा, अशी मागणी उबाठा सेनेचे सचिन बेर्डे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. टॉवरची सेवा लहरी पद्धतीची बनली असून पाच दिवस सुरू तर दहा दिवस बंद, अशी अवस्था आहे.
त्यामुळे कोंडगेतील बीएसएनएल ग्राहक कंटाळले आहेत. गावातील सर्व ग्रामस्थांचा हजार ते पाचशे रुपयांचा रिचार्ज वाया जातो. यामुळे जनता त्रस्त आहे. बेर्डे यांनी बीएसएनएलच्या लांजा येथील कार्यालयाची भेट घेऊन कोंडगेतील टॉवर कायम स्वरूपी सुरू करावा राहावा अशी मागणी केली. टॉवर सुरू न झाल्यास आंदोलन छेडू, अशा आशयाचे निवेदन दिले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 16/Sep/2025














