मंडणगड : मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी मराठा म्हणून दाखले देण्याच्या शासन अध्यादेशाच्या निषेधार्थ व अनेक मागण्यांकरिता १५ सप्टेंबर रोजी तालुक्यातील ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात ओबीसी समाजबांधवांनी हजारोंच्या संख्येने एकत्रित येऊन भव्य काढण्यात आलेला मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. कुणबी समाजोत्रती संघ, मुंबई तालुका शाखा मंडणगड यांच्या वतीने यावेळी निवासी नायब तहसीलदार संजय गुरव यांना याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी त्यांच्या बरोबरीने ओबीसीतील सर्व समाज घटकांचे प्रतिनिधी व सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनासाठी सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास शहरातील कुणबी भवन येथे मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव एकत्रित झाले. यावेळी शहरातून तहसीलपर्यंत गेला. काढण्यात आलेल्या मोर्चातील शहरपरिसर दणाणून जोरदार घोषणांच्या आवाजाने शहरपरिसरातून हा मोर्चा तहसीलवर धडकला.
यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या मागण्यांनुसार, हैद्राबाद गॅजेटीअर जीआर मागे घेण्यात यावा, मराठा समाजाला कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे ओबीसीमध्ये समावेश करण्यास ओबीसींचा ठाम विरोध आहे. मराठा आरक्षणासबंधित कुणबी नोंदी तपासण्यासाठी स्थापन करण्यात आलेली न्या. शिंदे समिती तात्काळ बरखास्त करावी. १ जून २००४ रोजी ओबीसीच्या यादीत अ.क्र.८३ कुणबीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या मराठा समाजाचा सर्व पोट जाती समावेश बाबतचा शासन निर्णय रद्द करून त्यांना ओबीसी यादीतून वगळण्यात यावे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार राज्य शासनाने मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसी आरक्षण देण्यात येवू नये, असे निवेदनात म्हटले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 16/Sep/2025














