साडवली : संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावामधील जमिनी परप्रांतीय लोकांना विकू नयेत, असा ठराव ग्रामपंचायतीत मंजूर करावा, असे निवेदन देवडे गावातील चिंचवलकर वाडीतील नवतरुणांचे सोमलिंग स्पोर्टस् क्लबच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले.
कोकणात वाढणारे पर्यटन, त्यातून मोठ्या प्रमाणात कोकणात परप्रांतीय जमीन खरेदी करत आहेत. देवडे गावचे निसर्गरम्य सौंदर्य तसेच गावातून विशाळगड पायवाट किंवा रस्ता तयार झाला तर गावात शिवप्रेमी आणि पर्यटकांची संख्या वाढेल. गावातील जमिनींचे महत्त्व वाढेल आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
गावच्या जडणघडणीसाठी, ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आणि विकासाची दिशा स्थानिकांच्या हाती राहण्यासाठी हे पाऊल अत्यंत स्वागतार्ह आहे, असा विचार करून महत्त्वपूर्ण सूचना सोमलिंग स्पोर्टस् क्लब देवडेच्या सदस्यांनी देवडेचे सरपंच विलास कांगणे यांना निवेदन दिले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 16/Sep/2025














