Mumbai goa highway Accident : महामार्गावर गुणदे फाटा येथे दोन वाहनांची धडक

खेड : तालुक्यातील गुणंदे फाटा परिसरात मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात बोलेरो व डस्टर गाडीचे मोठे नुकसान झाले. हा अपघात रविवार दि. १४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी साधारण १२.३० वाजता घडला. मिळालेल्या माहितीनुसार, किरण काशिराम शिगवण (३२, रा. असगणी शिगवणवाडी, ता. खेड) हे बोलेरो (क्र. एम. पी. ०९ ए.पी.६९८०) घेऊन चिपळूणहून कल्याणकडे जात होते.

त्यावेळी गुणंदे फाटा पुढे महामार्गाच्या एकेरी मार्गावर आरोपी राहुल विष्णुपंत बडवे (४८, रा. कोल्हापूर) हे भरधाव वेगात डस्टर गाडी (क्र. एम.एच.०९ ई.के.८२८८) चालवीत होते. आरोपीने समोर असलेल्या कंटेनरला ओव्हरटेक करताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले. परिणामी, डस्टर गाडीने बोलेरोच्या उजव्या बाजूला समोरच्या आरश्याजवळ धडक दिली. यात बोलेरोच्या उजव्या बाजूच्या दोन्ही दरवाजांना मोठे घासले गेले. तसेच डस्टरच्या समोरील उजव्या बाजूच्या बंपर व साईड फेल्डरला नुकसान झाले. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 AM 16/Sep/2025