खेड : तालुक्यातील भरणे येथील रहिवासी रमेश बाळा फगे (वय ४३) यांचा शोकांतिक मृत्यू साफसफाईदरम्यान झालेल्या अपघातात झाला. ही घटना रविवारी दि. १४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसा रमेश फगे हे आपल्या चुलत भावासह काळकाई मंदिराच्या कळसाची साफसफाई करत होते. साफसफाई पूर्ण करून शिडीवरून खाली उतरताना त्यांचा पाय घसरला.
सुमारे सात फूट उंचीवरून तोल जाऊन ते मंदिराच्या स्लॅबवर कोसळले. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला तसेच तोंड व नाकाला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. जखमी अवस्थेत त्यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघाती मृत्यूची नोंद खेड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 16/Sep/2025














