Accident : भरधाव कारची दुसऱ्या कारला धडक; दोघे जखमी

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर कोंडमळानजीक कारवरील नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडर तोडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या स्कोडा गाडीवर जाऊन आदळली. यामध्ये दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले अन् दोघेजण जखमी झाले आहेत. या प्रकरणी चालक संतोष पवार (रा. मार्कंडी-चिपळूण) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

हा अपघात १३ सप्टेंबर रोजी रात्री ८:३० च्या सुमारास कोंडमळा येथे घडला. या अपघातात नचिकेत विजय सूर्यगंध (२३, शिवाजीनगर, सध्या रा. डेरवण फाटा सावर्डे) व रितेश हनुमंत कोतवड (२२, रा. आंबेजोगाई रोड, यशवंतनगर, लातूर) हे दोघे जखमी झाले आहेत. या अपघाताबाबत नचिकेत सूर्यगंध याने सावर्डे पोलिसांना माहिती दिली. नचिकेत व त्याचा मित्र मुंबई-गोवा महामार्गावरून मुंबईच्या दिशेने चालले होते. त्यांची कार कोंडमळा येथे हॉटेलजवळ आली असता ते हॉटेलमध्ये चहा, नाष्ट्यासाठी जात होते. यावेळी अचानक मुंबई-गोवा महामार्गावरील गोव्याच्या दिशेने जाणारी सीआझ कारवरील चालकाचा ताबा सुटला व गाडी थेट डिव्हायडर ओलांडून मुंबईकडे जाणाऱ्या गाडीवर न आदळली. यामध्ये दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 PM 16/Sep/2025