Sadvli: डिजिटल युगातील ‘जनरेशन-झी’ला शिकवण्यासाठी शिक्षकांनी घेतले प्रशिक्षण

साडवली: आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांच्या गरजा आणि शिकण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. या बदलांशी सुसंगत अध्यापन करण्यासाठी शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

ही गरज लक्षात घेऊन प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, साडवली येथे ‘Teaching Gen-Z in a Digital World’ या विषयावर १३ व १४ सप्टेंबर २०२५ रोजी दोन दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम (Faculty Development Program) उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शिक्षकांना ‘जनरेशन-झी’ म्हणजेच आजच्या डिजिटल पिढीची मानसिकता, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि त्यांच्या शिकण्याच्या सवयी समजून घेण्यास मदत करणे हा होता. प्रशिक्षणामध्ये ‘माइंड मॅपिंग’ (Mind Mapping), ‘गेमिफिकेशन’ (Gamification) आणि ‘मायक्रोलर्निंग’ (Microlearning) यांसारख्या नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींवर भर देण्यात आला. केवळ सैद्धांतिक माहिती न देता, ‘हँड्स-ऑन अ‍ॅक्टिव्हिटीज’ आणि खेळांच्या माध्यमातून अध्यापन अधिक प्रभावी आणि रंजक कसे करता येते, याचा प्रत्यक्ष अनुभव शिक्षकांना देण्यात आला.

या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते आणि तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यामध्ये श्री. विश्वजीत काशीद (IIM TEDx स्पीकर, इंटरनॅशनल स्पीकर आणि प्लेटलेट्स डोनेशनचे गुडविल अ‍ॅम्बेसेडर) आणि श्री. सचिन कुंभोजे (कॉर्पोरेट ट्रेनर, Official StartUp India delegate ‘India-UAE StartUp Bridge’) यांचा समावेश होता. त्यांच्या प्रभावी सत्रांमुळे शिक्षकांना डिजिटल युगातील आव्हानांवर मात करण्यासाठी आवश्यक असलेले नवे दृष्टिकोन मिळाले. या प्रशिक्षणात प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या विविध शाळा आणि महाविद्यालयांमधील शिक्षक आणि इतर अश्या एकूण ११५ शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

या कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष श्री. रवींद्र माने, कार्याध्यक्षा सौ. नेहा माने, श्री. बळवंत नलावडे, डॉ. अमोल खाडे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थित पार पडले.

कार्यक्रमाची सांगता आणी प्रमाणपत्र वाटप संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रदुम्न माने, मानेज इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य सौ. सुमन अरोरा, मीनाताई ठाकरे महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. बळवंत नलावडे, राजेंद्र माने इंजिनीरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत, राजेंद्र माने पॉलीटेकनिक चे प्राचार्य श्री. नितीन भोपळे, आणी इतर मान्यवर यांच्या उपस्थित पार पडले. इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमोल खाडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले, तर प्रा. प्रशांत गुरव आणि प्रा. निकुल पटेल यांनी समन्वयक म्हणून विशेष परिश्रम घेतले.

प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेचे सीईओ श्री.प्रद्युम्न माने व मानेज इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापिका सौ. ईशानी माने यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष मा. रविंद्रजी माने साहेब यांनी विशेष कौतुक केले.

या प्रशिक्षण शिबिराला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, ‘डिजिटल युगातील अध्यापन अधिक परिणामकारक आणि विद्यार्थी-केंद्रित कसे करावे’ याबाबत मिळालेले ज्ञान शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 16-09-2025