चिपळूण : भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या वैशाली निमकर यांची भाजप ओबीसी सेल महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष दक्षिण रत्नागिरी जिल्हा या पदावर निवड करण्यात आली आहे. चिपळूण येथील बैठकीत जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी सौ. निमकर यांच्या नावाची घोषणा केली.
यापूर्वी निमकर यांनी चिपळूण शहर महिला आघाडी अध्यक्ष, चिपळूण शहर बेसिक भाजपच्या शहर अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. तसेच उत्तर रत्नागिरी जिल्हा चिटणीस म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. या निवडीबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, सरचिटणीस अमित केतकर यांचे सौ. निमकर यांनी आभार मानले. ओबीसी महिलांसाठी योजनांचा लाभ देऊन आत्मनिर्भर बनवण्यावर भर देणार असल्याचे त्या म्हणाल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 PM 16/Sep/2025












