रत्नागिरी : कोट-बौद्धवाडी व भांबेड प्रभानवल्ली फाटा येथे विनापरवाना हातभट्टी दारू व जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. संशयितांविरुद्ध लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अरविंद गणपत कांबळे (वय ४५, रा. कोट-बौद्धवाडी, लांजा) व पांडुरंग सीताराम पड्यार (वय ५८, रा. भांबेड-गुरववाडी, ता. लांजा) अशी संशयितांची नावे आहेत.
या घटना शनिवारी (ता. १३) रात्री आठ व दुपारी एकच्या सुमारास कोट बौद्धवाडी व प्रभानवल्ली फाटा येथे निदर्शनास आल्या पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित अरविंद कांबळे हे विनापरवाना ५२५ रुपयांची पाच लिटर दारू विक्री करत असताना सापडले, तर पांडुरंग पड्यार हे विनापरवाना मटका जुगार चालवत असताना सापडले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:05 16-09-2025












