Dapoli : केळशी परिसरातून ४ लाख किंमतीचा चरस जप्त

दापोली : तालुक्यातील केळशी येथील किनारा मोहल्ला परिसरात दापोली पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे ४ लाख रुपये किंमतीचे चरस जप्त केले आहे. याप्रकरणी एका ३२ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १५ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता दापोली पोलिसांनी किनारा मोहल्ला येथे छापा टाकला. त्यावेळी, अबरार इस्माईल डायली (वय ३२, रा. किनारा मोहल्ला, दापोली) याच्याकडे ०.९९८ किलोग्रॅम वजनाचा तपकिरी रंगाचा आणि उग्र वासाचा चरस हा अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगलेला आढळून आला. जप्त केलेल्या या चरसची किंमत सुमारे ४ लाख रुपये आहे.

पोलिसांनी तातडीने अबरार डायलीला अटक केली. याप्रकरणी त्याच्याविरोधात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (क) आणि २० (ब) (२) (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, १५ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजून ३० मिनिटांनी ही नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:22 PM 16/Sep/2025