पावस : राष्ट्रीय पातळीवर १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत २४ सप्टेंबरला गोळप ग्रामपंचायतीत स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे.
शिबिरात महिला, किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. महिला बचतगटाद्वारे तेल आणि साखरेचा वापर कमी करण्यासाठी मोहीम, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना कार्ड काढणे, आभाकार्ड काढणे, निक्षय मित्र स्वयंसेवक नोंदणी हे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. पावस प्राथमिक आरोग्यकेंद्रांतर्गत अभियानात सर्व उपकेंद्रांच्या ठिकाणी आरोग्य शिबिर होणार आहे. त्यामध्ये १९ सप्टेंबरला चांदोर, २० ला डोर्ले, २३ ला गावडेआंबेरे, २४ ला गणेशगुळे, २५ ला गावखडी, २६ ला पूर्णगड, २९ ला पावस प्राथमिक आरोग्यकेंद्र येथे शिबिर होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:21 PM 16/Sep/2025












