राजापूर : तालुक्यातील वाडा-पालये येथे पाण्याच्या वहाळात पडून एका 30 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना 14 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली असून, या घटनेची नोंद 15 सप्टेंबर रोजी नाटे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वसंत नामदेव पेडणेकर हे सकाळी 9 वाजता आपली गुरं घेऊन रानात गेले होते. ते परत आल्यानंतर त्यांना आपली 30 वर्षीय मुलगी प्रतीक्षा वसंत पेडणेकर घरात दिसली नाही. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता, घराशेजारील पाण्याच्या वहाळात ती उपडी पडलेली आढळली.
त्यांनी तात्काळ तिला राजापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी नाटे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.”
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:37 PM 16/Sep/2025












