रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राज्यभरात ‘सेवा पंधरवडा’ साजरा केला जात आहे. या अंतर्गत जिल्हा प्रशासनाने पंधरवडा कालावधितील उपक्रम हे मोहीम स्वरुपात युध्दपातवळीवर राबवून जनतेला लाभ देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
दि. १७ ते २२ सप्टेंबर पाणंद रस्तेविषयक मोहीम- शिव पाणंद रस्त्यांचे सर्व्हेक्षण करणे. ज्या पानंदरस्त्यांची नोंद निस्तार पत्रक वाजिबप उल अर्जामध्ये करण्यात आलेली नाही त्यांची नोंद घेण्याबाबत कार्यवाही करणे, शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी संमती पत्र घेणे. रस्ता अदालत आयोजित करून शेत रस्त्यांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे. शेत रस्त्यांची मोजणी व सीमांकन करणे.
२३ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या दुसऱ्या टप्प्यात सर्वांसाठी घरे या उपक्रमाची अंमलबजावणी व पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटप करणे- यामध्ये सर्वांसाठी घरे या उपक्रमांतर्गत घरे बांधण्यासाठी निर्बाध्यरित्या वाटपास उपलब्ध असलेली शासकीय जमीन कब्जे हक्काने प्रदान करणे. अस्तित्वातील रहिवासी प्रयोजनासाठी असलेल्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमातील तरतुदीनुसार नियमानुकुल करणे. आरक्षण विकास आराखड्याशी सुसंगत असल्यास शहरातील जमिनीवरील गायरान नोंदी कमी करून त्या जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकुल करणे तसेच आरक्षण विकास आराखड्याशी सुसंगत नसल्यास अतिक्रमण नियमानुकुल करण्यासाठी आरक्षण बदलाचे प्रस्ताव सादर करणे.
२८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या तिसऱ्या टप्प्यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम या अंतर्गत सर्व कातकरी समाजासाठी तालुका निहाय आधार नोंदणी, जातीचे दाखले वितरण, रेशन कार्ड, निवडणूक कार्ड वितरण, शालेय विद्यार्थ्यांसाठी शाळा तेथे दाखला अथवा मंडळस्तरावर दाखले वितरण करणे. सामाजिक अर्थसहाय्य योजनेतील सर्व लाभार्थी यांची डीबीटी पूर्ण करणे तसेच नवीन लाभार्थी शोधणे व १०० टक्के पात्र लाभार्थी यांना लाभ देणे. ई पंचनामा पोर्टल (नैसर्गिक आपत्ती) योजनेतील सर्व लाभार्थी यांची डीबीटी पूर्ण करणे. अर्धन्यायिक प्रकरणांचा (मंडळ अधिकारी ते अप्पर जिल्हाधिकारी) निपटारा करण्यासाठी लोक अदालतीचे आयोजन करणे.
१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर संत सेवालाल बंजारा / लमाण तांडा समृद्धी योजना- बंजारा / लमाण तांड्यासाठी ग्रामपंचायत स्थापन करणे. वस्तींना महसूल गावांचा दर्जा देणे, २८ ऑगस्ट २२५ रोजी च्या शासन निर्णयानुसार विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना द्यावयाची ओळखपत्रे, प्रमाणपत्रे व विविध शासकीय योजनांचा लाभ देणे.
सेवा पंधरवडा कालावधीत नागरिक शेतकरी व लाभार्थी यांनी संबंधित गावचे ग्राम महसूल अधिकारी मंडळ अधिकारी व तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा सेवा उपक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्यावतीने करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 AM 17/Sep/2025












