रत्नागिरी : मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सेवेसाठी दोन कार्ड आवश्यक

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे लोकार्पण २ ऑक्टोबर रोजी होणार आहे. रुग्णाच्या आधार कार्ड आणि रेशन कार्डवरून या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार, तपासण्या, शस्त्रक्रिया होणार आहेत.

शासनाच्या योजनेनुसार एखाद्या रुग्णाला एकूण खचपिक्षा शासनाकडून कमी रक्कम मंजूर झाली तरी उर्वरित खर्चाची रक्कम हॉस्पिटलमार्फत देणगीतून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे या हॉस्पिटलचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ. रवींद्र परदेशी यांनी सांगितले.

रत्नागिरी नगर परिषदेच्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे लोकार्पण ३ ऑक्टोबर रोजी होणार असल्याबाबत चर्चा सुरू होती. परंतु, या हॉस्पिटलचे लोकार्पण २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी होणार असल्याचे रनपच्या बांधकाम विभागाचे अभियंता यतीराज जाधव यांनी सांगितले. रत्नागिरी नगर परिषदेच्या या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्व व्यवस्थापन मुंबईच्या साधना फाऊंडेशन चॅरिटेबलकडून होणार आहे. येथील सर्व सेवांसाठी रुग्णाचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड आवश्यक आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि आयुष्यमान भारत योजनेंतर्गत याठिकाणी उपचारासह इतर सेवा मिळणार आहेत. या हॉस्पिटलमधील सर्व सुविधांमुळे येथील असंख्य रूग्णांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:59 21-09-2024