Mandangad : निगडी येथे एकाला जबर मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

मंडणगड : तालुक्यातील निगडी गावातील दोघांविरोधात एकाला जबर मारहाण केल्याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिर्यादी नजीर कोंडेकर रा. निगडी मोहल्ला (वय ५३) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १४ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री जिशान माटवणकर याने नजीर कोंडेकर यांना रात्री दहा वाजता घराबाहेर बोलावले व आपल्या बुलेटवरून त्यांना निगडी गावातील मारुती मंदिराजवळ नेले.

त्यानंतर या ठिकाणी अगोदरपासून उभा असलेल्या निहाल माटवणकर व जिशान माटवणकर या दोघांनी त्यांना शिवीगाळ करून धमकावून, लाकडी काठीने फिर्यादी यांना जबर मारहाण केली. या मारहाणीसंदर्भात संबंधित दोघांवर मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात मंडणगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 17/Sep/2025