Khed : पदवीधरांच्या वेतन त्रुटीसंदर्भात गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

खेड : वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ च्या अहवालातील वेतन श्रेणी विषयक व अनुषांगीक शिफारशी स्वीकृत करून कार्यवाही करण्याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेडच्या वतीने खेड तालुका गटशिक्षणाधिकारी विजय बाईत यांना निवेदन दिले.

बाईत यांनी हा विषय जिल्हा स्तरावर मांडून विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण सचिव धर्मपाल तांबे कार्याध्यक्ष अनिल यादव, तुकाराम काताळे, कोषाध्यक्ष नवनीत घडशी जिल्हा प्रतिनिधी श्रीकृष्ण खांडेकर, प्रवक्ते शैलेश पराडकर, सल्लागार अजित भोसले, परशुराम पेवेकर, संतोष यादव, दत्ताराम चव्हाण, धोंडीराम मिसाळ उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 18/Sep/2025

Kore Mobile