Rajapur : कोळवण खडी गावात रानडुकराचा धुडगूस; शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

पाचल : राजापूर तालुक्यातील कोळवण खडी गावात रानडुक्करांनी हैदोस घातला असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरीवर्गातून करण्यात येत आहे.

महिन्याभरापासून डुकराची झुंड च्या झुंड रात्री-अपरात्री शेतात घुसून भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. कोळवणखडीचे प्रगतीशील शेतकरी नागेश बने यांच्या एक एकर भातशेतीचे रानडुक्करांनी नुकसान केले आहे. शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला जात आहे. भात लांबी वर येऊ लागली आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 AM 18/Sep/2025

JMBR ACADEMY – ADMISSIONS OPEN!