Ratnagiri: जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय विजयी

रत्नागिरी – नुकत्याच डेरवण येथे झालेल्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या १९ वर्षांखालील मुली व मुलांच्या संघाने विजेतेपद मिळवले. ह्या दोन्ही संघांची १६ सप्टेंबर रोजी सातारा येथे होणाऱ्या विभागीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

संघाला क्रीडा शिक्षक श्री. राकेश मालप व श्रीमती लीना घाडीगावकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, सचिव श्री. सतीशजी शेवडे, जिमखाना अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य श्री. सुनील गोसावी व पर्यवेक्षक श्री. विद्याधर केळकर यांनी सर्व विजयी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:06 20-09-2025

Arihant 3