Pali: मराठा मंदिर हायस्कूलमध्ये ‘शालेय स्वराज्य सभा’ची निवडणूक, विद्यार्थ्यांच्या लोकशाही सहभागातून निवडले नवे पदाधिकारी

पाली : मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पाली येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी ‘शालेय स्वराज्य सभे’ची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. विद्यार्थ्यांच्या लोकशाही सहभागातून विविध पदांवर नव्या मंत्र्यांची निवड करण्यात आली असून, या सभेमुळे विद्यार्थ्यांना लहान वयातच नेतृत्वगुणांचे धडे मिळत आहेत.

या वर्षी मुख्यमंत्री म्हणून कुमारी आध्या राजेंद्र कृतडकर (दहावी अ) हिची निवड झाली. तसेच, इतर महत्त्वाच्या पदांवरही विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे:

  • सांस्कृतिक मंत्री: कुमारी आयेशा अजिज पेजे
  • क्रीडा मंत्री: कुमार रितेश राजाराम सावंत
  • सहल मंत्री: कुमार समर्थ दिलीप खानविलकर
  • शिस्त मंत्री: कुमार यश रमाकांत गिडीये
  • आरोग्य मंत्री: कुमार आर्यन विजय सावंत
  • पर्यावरण मंत्री: कुमार श्रवण दीपक पवार
  • स्वच्छता मंत्री: कुमारी श्रेया समीर शिगवण
  • ग्रंथालय मंत्री: कुमारी मनस्वी शंकर नागले
  • विद्यार्थिनी प्रतिनिधी: कुमारी श्रावणी दीपक पवार

  • शालेय स्वराज्य सभेचे प्रमुख श्री. तुफिल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि यशस्वीपणे पार पडली. शाळेचे मुख्याध्यापक श्री. कुशाबा करे, पर्यवेक्षिका सौ. नम्रता गोगटे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 24-09-2025

Arihant 4