Ratnagiri : नेवरे येथे वृद्धाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे येथे घराच्याबाहेरील परिसरात वृद्ध मृतावस्थेत वृद्ध आढळला. उत्तरीय तपासणीसाठी त्याचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. दिवाकर बाळकृष्ण सुर्वे (वय ७०, रा. भंडारपुळे मुळ : नेवरे, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे.

ही घटना गुरुवारी (ता. २५) दुपारी निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिवाकर सुर्वे हे मोलमजुरी करत होते. गुरुवारी दुपारी ते मृतावस्थेत आढळले. नातेवाईक सुरेश एकनाथ सुर्वे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी सुर्वे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 AM 26/Sep/2025

Shanti 3