वेळेचे नियोजन हीच यशाची गुरुकिल्ली : संजय देसाई

लांजा : सध्याच्या स्पर्धेच्या युगात – करिअरच्या दृष्टीने स्वतःला सिद्ध करायचे असेल तर विद्यार्थ्यांनी सजग राहून वेळेचे नियोजन आतापासूनच करायला हवे. वेळेचे नियोजन हेच यशाची गुरूकिल्ली आहे असे प्रतिपादन पुणे येथील टाटा मोटर्स चे अभियंता संजय देसाई यांनी लांजा – तालुक्यातील खावडी हायस्कूल येथे केले.

सह्याद्री श्रमिक शिक्षण संस्था – मुंबई संचलित श्री सरस्वती विद्यानिकेतन माध्यमिक शाळा खावडी या प्रशालेच्या वतीने नुकतेच वेळेचे व्यवस्थापन या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुणे येथील टाटा मोटर्सचे अभियंता संजय देसाई बोलत होते. या कार्यक्रमावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डी.डी.देसाई, मुख्याध्यापिका दामिनी भिंगार्डे, ज्येष्ठ शिक्षक गणेश कांबळे, अमृता वास्कर, सरोजिनी चव्हाण, एन बी कदम उपस्थित होते. प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी नियोजन किती महत्त्वाचे आहे हे सांगताना परीक्षा, खेळ, अभ्यास. किचन इत्यादी ठिकाणचे योग्य नियोजन नसेल तर आपण योग्य ध्येय गाठू शकत नाही. विद्यार्थ्यांनी योग्य नियोजन करून चांगले यश कसे मिळवता येईल याबाबत त्यांनी उदाहरण देत वेळेचे महत्त्व पटवून दिले.

या वेळी संजय देसाई यांच्याहस्ते इस्रो मध्ये जाऊन आलेली विद्यार्थीनी मनस्वी गुरव हीचे पुष्पगुच्छ देऊन कौतूक करण्यात आले. त्यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष डी. डी. देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक मुख्याध्यापिका दामिनी भिंगार्डे यांनी तर सूत्रसंचालन शिक्षिका अमृता वास्कर यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 04/Oct/2025