Ratnagiri : भाट्ये किनाऱ्यावर स्वच्छता अभियान

रत्नागिरी : नगर राजभाषा कार्यान्वयन समितीच्याअंतर्गत बँक ऑफ इंडिया विभागीय कार्यालयाद्वारा भाट्ये येथील समुद्रकिनारा व श्री झरीविनायक मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यामध्ये १२५ पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

यावेळी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. यात नगर राजभाषा समितीचे केंद्र सरकारी कार्यालय, बँक, विमा आणि केंद्र सरकारच्या अंतर्गत असणारे कार्यालय सहभागी झाले. आपले सामाजिक दायित्व समजून समिती व बँकर्सद्वारा विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात. गुरुवारी महात्मा गांधी जयंतीनिमित्त समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम संयुक्तपणे आयोजित केली साचलेला कचरा गोळा करण्यासाठी गेली होती.

स्वच्छता मोहिमेत बँक ऑफ इंडिया विभागीय कार्यालय, बँक ऑफ महाराष्ट्र विभागीय कार्यालय, अन्य बँकर्स, भारतीय तटरक्षक वायू अवस्थान, भारतीय तटरक्षक कार्यालय, आयकर, न्यू इंडिया एश्योरेन्स कंपनी, दीपस्तंभतथा डीजीपीएस कार्यालय, डाक कार्यालय आदी संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग घेतला. स्वच्छता मोहिमेत बँक ऑफ इंडियाचे विभागीय प्रमुख नरेंद्र देवरे तथा उपविभागीय प्रमुख अंजनी कुमार सिंह आजाद व बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय प्रमुख सागर नाईक यांनी सहभाग घेत मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहित केले. अग्रणी जिल्हा कार्यालयाचे व्यवस्थापक तथा समितीचे सदस्य सचिव व बँक ऑफ इंडियाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष योगदान दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 PM 04/Oct/2025