Chiplun : चिपळूण नगर परिषद तर्फे स्वच्छता मोहीम

चिपळूण : स्वच्छता ही सेवा मोहीम अंतर्गत ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ या थीम अंतर्गत स्वामी मठ रोड ते रामेश्वर मंदिर परिसर चिपळूण येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

चिपळूण नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालय अधीक्षक रोहित खाडे यांच्या मार्गदर्शनखाली, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते यांच्या नियोजनाखाली ही स्वच्छता मोहिम राबवण्यात आली.

या उपक्रमात महात्मा गांधी प्रतिष्ठान सदस्य, अॅक्टिव्ह ग्रुप सदस्य, डी. बी.जे कॉलेजचे विद्यार्थी, आनंदराव पवार महाविद्यालय, युनायटेड इंग्लिश स्कूल, महाराष्ट्र हायस्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी अग्निशमन अधिकारी आनंद बामणे, शहर अभियंता दीपक निंबाळकर, मिळकत व्यवस्थापक सागर शेडगे, सहाय्यक अंतर्गत लेखापाल अवधूत बेंद्रे, संगणक अभियंता निवेदिता आंबेकर, विद्युत अभियंता संगिता तांबोळी, उद्यान विभाग प्रमुख प्रसाद साडविलकर, आस्थापना प्रमुख राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते. या स्वच्छता मोहिमेला नगर परिषद कर्मचाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद लाभला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 PM 06/Oct/2025

Mahrashi karve ANM