रत्नागिरी : महायुतीमध्ये उमेदवार निवडतानाच नेतेमंडळींची दमछाक झाली असून, त्यांना मित्र पक्षांचे उमेदवार आपल्या पक्षात घ्यावे लागले आहेत. महायुतीची कामे मागील नऊ वर्षांत जनतेने पाहिली आहेत. त्यामुळे पर्यायी सत्ताधारी म्हणून महाविकास आघाडी रत्नागिरीत सज्ज झाली असल्याचा विश्वास महाविकास आघाडीतील उबाठा शिवसेनेचे उपनेते बाळ माने यांनी व्यक्त केला.
रत्नागिरीत आयोजित या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे रमेश कीर, राष्ट्रवादीचे मिलिंद कीर, उवाठाचे तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, रवींद्र डोळस, मनसेचे अविनाश सौंदाळकर यांच्यासह बसपा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या संघटनांसह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बाळ माने म्हणाले की, महायुतीची बोट रत्नागिरीत ओव्हरलोड झाली आहे. भाजपासारख्या राष्ट्रीय पक्षातील अनेक पदाधिकारी शिंदे शिवसेनेसारख्या छोट्या पक्षात दाखल झाले आहेत अशी स्थिती आहे. सहा महिन्यात टिकावू रस्ते जे दहा वर्ष टिकतील अशा पद्धतीने बनवू, असे त्यांनी सांगितले. महा विकास आघाडी तर्फे शिवानी सावंत माने आणि ३२ नगरसेवक विजयी होतील असा विश्वास माजी आमदार बाळ माने यांनी व्यक्त केला. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे रमेश कीर यांनीही महाविकास आघाडी मोठ्या फरकाने विजयी होईल, अशा भावना व्यक्त केल्या.
प्रचाराला नेत्यांची फौज येणार…
महाविकास आघाडीच्या प्रचाराला खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सकपाळ, माजी खा. विनायक राऊत, आ. भास्कर जाधव व मान्यवर येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 AM 18/Nov/2025














